पंचतारांकित हॉटेल्सवर चालणार मुंढेंचा बुलडोजर

माता कचेरीनजिक असलेल्या मी मराठी ही खानावळसुद्धा विनापरवानगी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या खानावळीचे बांधकामही लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्यांनी पाडले.
 corporation demolished rooftop restaurants in nagpur
corporation demolished rooftop restaurants in nagpur

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशावरून हिंगणा टी-पॉईंटवरील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूफ टॉप रेस्टॉरंटचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. अग्निशमन विभागाने पंचतारांकित हॉटेल्ससह 22 हॉटेल्सची यादी तयार केली असून आयुक्तांनी या सर्व हॉटेल्सवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

शहरात मोठ्या प्रमाणात रूफ टॉप हॉटेल्सची बजबजपुरी झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी हॉटेल्स व्यवस्थापनाने महापालिकेची कुठलीही परवानगी घेतलेली नाही. अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या रुफ टॉप हॉटेल्सची यादी अग्निशमन विभागाने तयार केली. यात सोमलवाडा येथील हॉटेल सेंटर प्वाईंट, वर्धा रोडवरील हॉटेल प्राईड, अजनीतील यशोधाम एनक्‍लेवमधील रोसेस्टा एलिट क्‍लब, मनीषनगर टी-पाईट येथील हाईट रुफ टॉवर, अभ्यंकरनगरातील सेव्हन सूट रुम ऍन्ड रेस्टारंट, कोरीएंड लिफ, वर्धा रोडवरील कन्नमवारनगरातील पटियाला हाऊस मोका स्काय, हॉटेल ट्रॅव्होटेल, धरमपेठेतील रुफ रेस्टॉरंट, रामदासपेठेतील तुली एम्पेरियल हॉटेल, सिताबर्डीतील चील ऍन्ड ग्रीन रेस्टॉरंट आणि लॉज, सदर माऊंट रोडवरील सीजन किचन ओपन रेस्टॉरंट, कारनेशन ओपन रेस्टॉरंट, धरमपेठ ट्राफिकजवळील श्री वली ओपन रेस्टॉरंट, धंतोलीतील हेवन हायलाईफ रेस्टॉरंट, वऱ्हाडी थाट, झाशी राणी चौकातील हॉटेल श्रवण, जरीपटक्‍यातील मॅजिक फूड कोर्ट, अभ्यंकरनगरातील व्हिला, अमरावती रोडवरील दि. टिंबर ट्रंक, हिंगणा रोडवरील दि बिहाईन्ड दि बार या हॉटेल्सच समावेश आहे. 

दरम्यान, आज आयुक्त मुंढे यांच्या निर्देशावरून लक्ष्मीनगर झोन अंतर्गत असलेल्या हिंगणा टी-पॉईंटवरील टाकळी सीम येथील एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील आंगण गजाली या रुफ टॉप रेस्टॉरंटचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. रेस्टॉरंटचे संचालक प्रसन्न दारव्हेकर यांनी या रेस्टॉरंटसाठी अग्निशमन विभागाची परवानगी घेतली नाही. शिवाय बांधकामासाठीही मंजुरी घेण्यात आली नाही. तेथे लाकडी तट्टे, लाकडी पार्टीशन, बांबू व किचनमध्ये एलपीजी गॅस अशा ज्वलनशील वस्तूंचा वापर होत असल्याचे मनपा अग्निशमन विभागाच्या लक्षात आले. यासाठी 24 नोव्हेंबर 2016 आणि 31 मार्च 2018 रोजी नोटीस देण्यात आली होती. मात्र या नोटीसकडे दुर्लक्ष करीत संचालकांनी रेस्टॉरंट सुरूच ठेवले. अखेर आयुक्तांच्या निर्देशानुसार लक्ष्मीनगर झोन आणि अग्निशमन विभागाच्या वतीने कारवाई करीत अवैध असलेले संपूर्ण बांधकाम तोडण्यात आले. याव्यतिरिक्त 15 हजार 15 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

माता कचेरीनजिक असलेल्या मी मराठी ही खानावळसुद्धा विनापरवानगी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या खानावळीचे बांधकामही लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्यांनी पाडले. या खानावळीचे संचालक भूषण मुरारकर यांना 26 जुलै 2017 रोजी नोटीस देण्यात आली होती. परंतु त्यांनी नोटीसकडे दुर्लक्ष केले. अखेर या हॉटेलवर शुक्रवारी मनपाने बुलडोजर फिरवला. उपायुक्त महेश मोरोणे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांच्या मार्गदर्शनात अभियंता राजू फाले, कृष्णा कोल्हे तसेच अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com