corporation apointments cancelled | Sarkarnama

महामंडळांवरील नियुक्‍त्या रद्द झाल्या! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

विधानसभेचा कालावधी संपल्यामुळे या नियुक्‍त्या आता रद्द झाल्या आहेत. 

मुंबई : तेराव्या विधानसभेचा कालावधी शनिवारी (ता. 11) साडेपाच वाजता संपुष्टात आल्याने महामंडळांवरील नियुक्‍त्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे महामंडळांवर आता प्रशासक राहणार आहेत. 

राज्याच्या मंत्रिमंडळात संधी हुकलेल्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींसह इतर वजनदार राजकीय नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी महामंडळांवर वर्णी लावली जाते. राज्यात 100 च्या आसपास महामंडळे आहेत. म्हाडा, सिडको, एसटी महामंडळ, कृष्णा खोरे, विदर्भ खोरे, तापी, उर्वरित महाराष्ट्र आदींचा समावेश होतो. आर्थिक दुर्बल घटकांसाठी महामंडळाची निर्मिती केली आहे. यामध्ये अण्णा भाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री महामंडळांवर अध्यक्ष, चेअरमन या पदांसाठी राजकीय निवड करतात; मात्र या विधानसभेचा कालावधी संपल्यामुळे या नियुक्‍त्या आता रद्द झाल्या आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख