corporater in nagpur | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

शिवीगाळ नगरसेवकाची, शिक्षा ठाणेदाराला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नागपूर : नागपुरातील ठाणेदाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करणाऱ्या ठाणेदाराची तात्काळ बदली करण्यात आली. 

नागपूर : नागपुरातील ठाणेदाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करणाऱ्या ठाणेदाराची तात्काळ बदली करण्यात आली. 

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी गेल्या रविवारी रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदार व पोलिसांना अत्यंत आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केली. या प्रकाराचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर तिवारींच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीने दयाशंकर तिवारी यांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. परंतु न्यायालयाने तिवारी यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत. 

भाजपच्या नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या व आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर न करणाऱ्या महेश चव्हाण या ठाणेदाराची बदली 48 तासात करण्याची "तत्परता' राज्य सरकारने दाखविली आहे. महेश चव्हाण यांची बुधवारी बदली करण्यात आली. पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे "बक्षिस' ठाणेदार चव्हाण यांना मिळाल्याचे बोलले जात आहे. 

तिवारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर उच्च पातळीवरून सूत्रे हालल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंबईवरून ठाणेदाराची बदली करण्याचे आदेश नागपूरच्या पोलीस आयुक्तांना आल्याचे बोलले जात आहे. या तात्काळ बदलीमुळे मात्र पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या ठाणेदाराला शाबासकी देण्याऐवजी त्याची बदली केल्याने पोलिस प्रशासनात नाराजी पसरल्याचे समजते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख