जामखेडची कोरोनागाडी थांबेना, पुन्हा तीनजण पाॅझिटिव्ह

काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्यादोन युवकांनाही लागण झाली. त्यानंतर यापैकी एकायुवकाच्या वडिलांना, तर नंतर या युवकाच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधीत आढळून आल्या.
Corona
Corona

नगर : जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढच होत असून, ही साखळी तुटायला तयार नाही. आज आलेल्या अहवालात पुन्हा तिघांची भर पडली आहे. त्यामुळे जामखेडमधील कोरोनाबाधितांची संख्या 17 झाली असून, जिल्ह्याची संख्या 43 वर पोहोचली आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच जिल्हा प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल ४१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ३८ व्यक्तींचे अहवाल काल रात्री मिळाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरित तीन अहवालाची प्रतीक्षा होती. ते अहवाल आज दुपारी प्राप्त झाले. ते तीनही पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये 35, 45 व 40 अशी त्यांची वय आहेत. 

काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या  दोन युवकांनाही लागण झाली. त्यानंतर यापैकी एका   युवकाच्या वडिलांना, तर नंतर या युवकाच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधीत आढळून आल्या.

यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या आता ४३ झाली आहे. त्यापैकी २४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या बूथ हॉस्पिटल मध्ये १४ रुग्ण असून, या तिघांना आता तिकडे हलविण्यात येणार आहे. 

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्यावतीने आतापर्यंत एक हजार ४९५ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील एक हजार ४१९ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. अजून १५ अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या ६९० व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, १२२ जणांना हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यात जिल्हा रुग्णालयात १०२, एआयएमएस मध्ये ०६ व्यक्ती उपचार घेत आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com