अजितदादांचे टेन्शन वाढले : बारामतीत सापडला कोरोनाचा रुग्ण

बारामतीकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
ajit pawar
ajit pawar

बारामती : शहरातील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. ससून रुग्णालय व बी.जे. मेडीकल कॉलेजने संबंधित रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल दिल्यानंतर आता प्रशासनाने उपाययोजनांना युध्दपातळीवर प्रारंभ केला आहे.

शहरातील एका रिक्षाचालकाला कोरोनाची लागण झाल्याचे आज त्याच्या वैद्यकीय अहवालावरुन स्पष्ट झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. दरम्यान बारामती नगरपालिका व आरोग्य विभागाने संबंधित रुग्णाच्या घराच्या आसपासचा जवळपास तीन किलोमीटरचा परिसर सील केला आहे.

या परिसरातील प्रत्येक कुटुंबाचे वैद्यकीय सर्वेक्षण केले जाणार असून या परिसरात पुन्हा नव्याने निर्जतुंकीकरण केले जाणार आहे. दरम्यान या रुग्णाच्या संपर्कात अनेक जण आले असून त्यांचीही वैद्यकीय तपासणी करुन त्यांनाही चौदा दिवस होम कोरोंटाईन केले जाणार आहे. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी बनविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

श्रीरामनगर हे केंद्र  धरुन 3 किमी परिसरात कंटेनमेंट  झोन म्हणुन व तेच केंद्र धरुन 5 किमी परिसर बफर झोन म्हणुन घोषित करण्यात आला आहे. सर्व प्रकारची वाहतुक नियंत्रित करण्यात येणार असून अत्यावश्यक सेवा यांना यातुन वगळले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय  बाहेर पडू नये. कंटेनमेंट झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करण्यात आली असून तेथुन सर्व वाहने तपासणी करुन सोडण्यात येतील, असे कांबळे यांनी सांगितले.

कोरोनाचा पहिला रुग्ण बारामतीत आढळला असल्याने बारामतीकरांनी घराबाहेर पडू नये, स्वताःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, प्रशासनाच्या वतीने देण्यात येणा-या सूचनांचे पालन करावे, गर्दी टाळून पोलिसांना सहकार्य करावे. शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत असून त्याला बारामतीकरांनी साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com