पिंपरीत आणि मुंबईत दोघांना नव्याने लागण : कोरोनारुग्ण 41 वर पोहोचल्याने हे नवीन निर्णय

...
corona
corona

पुणे : राज्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली अहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४१ झाली आहे. यापैकी एक रुग्ण मुंबईचा असून हा ४९ वर्षाचा तरुण ७ मार्च रोजी अमेरिकेवरुन परतलेला आहे. तर दुसरा रुग्ण हा पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात भरती असून हा २६ वर्षीय तरुण १४ मार्च रोजी अमेरिकेहून परतलेला आहे.

कोरोनाच्या साथीमुळे पुण्यातील अनेक आस्थापना, दुकाने आता बंद राहणार आहेत. माॅल्स, शाळा, जिम आता हाॅटेलही पुढील काही दिवस बंद राहणार आहेत. राज्य सरकारी कार्यालये सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने आज जाहीर केला.

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे येरवडा कारागृहातील कैद्याची त्यांचे नातेवाईक व वकीलाची होणारी भेट बुधवारपासून एक आठवडयासाठी बंद करन्यात आली आहे. याबाबत कारागृह प्रशासनातर्फे पुणे बार असोसीएशन या वकिलाच्या संघटनेला कळविण्यात आले आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडुन बनावट सैनीटायझर बनविणारा मध्यवर्ती कारखान्यावर छापा. तब्बल 27 लाख रूपयांचे बनावट सैनीटायझर व कच्चा वस्तु पोलिसांकडुन जप्त,

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुले येरवडा कारागृहातील कैद्याची त्यांचे नातेवाईक व वकीलाची होणारी भेट बुधवारपासून एक आठवडयासाठी बंद करन्यात आली आहे. याबाबत कारागृह प्रशासनातर्फे पुणे बार असोसीएशन या वकिलाच्या संघटनेला कळविन्यात आले आहे.
पीएमपीच्या 583 बसच्या फेऱ्या रद्द करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.  फक्त 1000 बसद्वारे आता पुणे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रवासी वाहतूक होणार, असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

मध्य रेल्वेने केल्या 23 गाड्या रद्द केल्या आहेत.

मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस 
पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस 
पुणे नागपूर एक्सप्रेस 
पुणे अजनी एक्सप्रेस  
अजनी पुणे एक्सप्रेस  
मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस 


रेल्वे स्थानकांवरील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर या रेल्वे विभागांमध्ये पुढील आदेश येईपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट दहा रुपयांवरून पन्नास रुपये करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने मंगळवारी जाहीर केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com