CORONA : मुंबईतील " त्या 'पोलिस उपायुक्तांचा अहवाल निगेटिव्ह

या पोलिस उपायुक्तांना कोरोनाची लक्षण आढळल्यामुळे त्यांना लिलावती रूग्णालयमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
 CORONA : मुंबईतील " त्या 'पोलिस उपायुक्तांचा अहवाल निगेटिव्ह

मुंबई : डॉक्‍टर्स, नर्स आणि पोलिस अधिकारी-कर्मचारी कोरोनाविरोधातील युद्ध लढत आहे. या लढाईत रस्त्यावर उतरलेल्या काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. काल लिलावती रूग्णालयमध्ये दाखल करण्यात आलेल्या मुंबईतील एक पोलिस उपायुक्ताचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

या पोलिस उपायुक्तांना कोरोनाची लक्षण आढळल्यामुळे त्यांना लिलावती रूग्णालयमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पोलिस उपायुक्त यांच्या सोबत असणारा कर्मचारी वर्ग सुद्धा होम कोरंटाईन करण्यात आला होता.

मात्र पोलिस उपायुक्त यांची रिपोर्ट आता नेगेटिव्ह आला आहे. कोरोनाशी लढताना आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनीही थोडी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 

या सर्वांच्या कार्याला जनतेने सलाम केला असून सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मात्र अजूनही काही मंडळी कोरोनाच्या परिणामाची चिंता करीत नाही याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

काही ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडपेक केली जात आहे. काही ठिकाणी शिवीगाळ तर थुंकड्याचे काम केले जात आहे. याविषयी समाजात संतप व्यक्त केला जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com