corona mamata banerjee appeal to people about safe destance | Sarkarnama

ममतादिदी रस्त्यावर उतरल्या ! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 मार्च 2020

मुख्यमंत्री ममतादिदिनी रस्त्यावर उतरून थोडी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जर रस्त्यावर आलाच तर सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.  

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांसाठी रस्त्यावर उतरल्याच. कोरोनाच्या पार्श्वभूमी लोकांनी सुरक्षित अंतर ठेवावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तसेच हातात खडू घेऊन सुरक्षित अंतराचे रिंगणही आखले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तरीही काही मंडळी नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. मुख्यमंत्री ममतादिदिनी रस्त्यावर उतरून थोडी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जर रस्त्यावर आलाच तर सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख