कोरोना : तुकाराम मुंढेंनी महानगरपालिकेतील कर्मचारी केले "फिप्टी-फिप्टी'

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेतही पूर्ण कर्मचाऱ्यांना हजर राहण्याऐवजी आळीपाळीने हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेतही पूर्ण कर्मचाऱ्यांना हजर राहण्याऐवजी आळीपाळीने हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेतही पूर्ण कर्मचाऱ्यांना हजर राहण्याऐवजी आळीपाळीने हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

नागपूर ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने काल, बुधवारी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांवर आणण्याचा निर्णय जाहीर केला. राज्य सरकारच्या निर्देशाची अंमलबजावणी करीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेतही पूर्ण कर्मचाऱ्यांना हजर राहण्याऐवजी आळीपाळीने हजर राहण्याचे निर्देश दिले. याबाबत त्यांनी विभागप्रमुखांना आज सूचना दिल्या. दरम्यान, शहरातील आपली बसमधील गर्दी टाळण्यासाठी आसनानुसारच प्रवाशांना स्थान दिले जाणार आहे.

कोरोना विषाणुंचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे. तसे परिपत्रक आयुक्तांनी वेळोवेळी काढले. आज त्यांनी महापालिकेतील 50 टक्के कर्मचारी एका दिवसाआड कार्यालयात येतील, याबाबत परिपत्रक काढले.

शहर बससेवेतही गर्दी टाळण्याचे निर्देश त्यांनी दिले. कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कार्यालयात दररोज न येता आळीपाळीने यावे, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिल्लक राहीलेली कामे कामाच्या दिवशी पूर्ण करावी, असेही त्यांनी आदेशात नमुद केले आहे. महानगरपालिकेच्या आपली बसमध्ये जेवढी आसन क्षमता आहे तेवढेच प्रवासी बसविण्यात यावेत. आसन क्षमतेपेक्षा एकही अतिरिक्त प्रवासी बसमध्ये घेण्यात येऊ नये, असे निर्देश परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी दिले. बोरकर यांनी मोरभवन येथील बसस्थानकाला आकस्मिक भेट दिली. यावेळी मनपाचे परिवहन विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बोरकर यांनी आपली बसच्या वाहक चालकांशी संवाद साधला. कोरोनाच्या संरक्षणाच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात यावी. कोरोनाच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. बसमध्ये गर्दी होणार नाही याची विशेष खबरदारी घेत अतिरिक्त प्रवासी टाळावेत. आसन क्षमतेव्यतिरिक्त कोणताही प्रवासी उभ्याने प्रवास करणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

कर्मचारी, अधिकाऱ्यांना तत्काळ सुटी
कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुटी मागितल्यास तत्काळ मंजूर करण्यात यावी, असेही आयुक्तांनी नमुद केले आहे. वैद्यकीय प्रमाणपत्राची अटही सुटीसाठी शिथिल करण्यात आली आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पत्ता, मोबाईल क्रमांक कार्यालयात द्यावा. गरज पडल्यास त्यांनी तत्काळ उपस्थित राहावे, असेही आयुक्तांनी आदेशात नमुद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com