CORONA : अमेरिका हादरली, एका दिवसात 250 जणांचा मृत्यू 

जगात 7,84,716 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून आतापर्यंत 37,686 लोकांचा मृत्यू झाला आहे.
CORONA : अमेरिका हादरली, एका दिवसात 250 जणांचा मृत्यू 

पुणे : कोरोनाचे महासंकट देशभर वाढत असताना प्रत्येकांच्या चेहऱ्यावर चिंता आहे. काय होणार जगाचे ? या प्रश्‍नाचे प्रत्येकाला उत्तर हवे असताना अमेरिकेत गेल्या चोवीस तासात 250 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा आतापर्यंत सर्वाधिक असून अमेरिका प्रशासन हादरून गेले आहे. आतापर्यंत अमेरिकेत 3008 लोक कोरोनाची शिकार बनले आहेत. 

बलाढ्या अमेरिकेत एकीकडे असा आकडा वाढत असताना इटलीतही गेल्या चोवीस तासात 812 लोक मृत्युमुखी पडले आहेत. 

कोरोनाच्या संकटात एक लाख अमेरिकन लोकांचे जीव जीव गेले तरी मी खूप चांगले काम केले असे मी समजेन असे कालच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी हे धक्कादायक विधान करून काही तास उलटत नाहीत तोवर 250 लोक मृत्युमुखी पडले आहेत.

या घटनेने अमेरिकेमध्ये भय पसरले आहे. या देशातील संकट संपण्यास जून उजाडेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोरोनाने जगभर हा:हा:कार माजला आहे.आज दोनशे देशात कोरोनाने आपले जाळे विनले आहे. 

चीननंतर युरोप खंडात कोरोना झपाट्याने पसरला आहे. इटली आणि स्पेनमध्ये मृतांचा आकडा दररोज वाढत आहे. दरम्यान एकट्या इटलीत 11,591 जणांचा तसेच स्पेनने 7,716 लोक मृत्यू झाला आहे. 

कोरोनाने देशनिहाय बळी पुढीलप्रमाणे 

इटली - 11591 
स्पेन - 7716 

चीन - 3186 

फ्रांस - 3024 

अमेरिका - 3008 

ईरान - 2757 

ब्रिटेन - 1408 

नीदरलैंड - 864 

जर्मनी - 645 

बेल्जियम - 513 

स्विट्‌जरलैंड - 359 

तुर्की - 168 

ब्राजील - 163 

साउथ कोरिया - 150 

स्वीडन - 146 

पुर्तगाल - 140 

इंडोनेशिया - 122 

ऑस्ट्रिया - 108 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com