कॉन्व्हेंटमध्ये शिकून मुले गोमांस खातात : गिरिराजसिंह 

कॉन्व्हेंटमध्ये शिकून मुले गोमांस खातात : गिरिराजसिंह 

बेगुसराय (बिहार) : "कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकून परदेशात जाणारे बहुतांश भारतीय गोमांस खाण्यास सुरुवात करतात,'' असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते गिरिराजसिंह यांनी केले. 

वाद निर्माण होतील अशी विधाने करीत सतत चर्चेच राहणारे गिरिराजसिंह यांनी भागवत कथा महोत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात बोलताना गोमांस खाण्याचा संबंध कॉन्व्हेंट शाळांशी जोडला. 

ते म्हणाले, ""खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गीतेचे श्‍लोक शिकवायला हवेत आणि शाळांमध्ये मंदिर उभारावे. आपण आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळेत पाठवतो. तेथे शिकून मुले आयआयटीत जातात. अभियंते, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक बनतात. पण, पुढे हीच मुले जेव्हा परदेशात जातात तेव्हा अनेक जण गोमांस खातात. कारण, आपण त्यांना आपले संस्कार, परंपरा, मूल्य, त्यांच्यावर योग्य संस्कार, श्रावण बाळाचे संस्कार शिकवत नाही. म्हणूनच, मुलांना लहानपणापासूनच शाळांमध्ये गीतेचे श्‍लोक आणि हनुमानस्तोत्र शिकवणे आवश्‍यक आहे.'' 

"भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची गरज' 
गिरिराजसिंह म्हणाले की, मी अनेक घरांची पाहणी केली. पण, त्यातील फक्त 15 घरांमध्ये हनुमानस्तोत्र, तर तीन घरांमध्ये रामायण आणि भगवद्‌गीता आढळली. यामुळेच, आपल्या मुलांना परंपरेची ओळख होत नाही. पण, आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. आपल्या येथे प्रखरतावादाला स्थान नाही. भारताचा बचाव करण्यासाठी भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याची गरज आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com