Congress's cautious stand on Narayan Rane | Sarkarnama

नारायण राणेंबाबत काँग्रेसची सावध भूमिका

संदीप खांडगे पाटील
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नारायण राणेंसह त्यांचे दोन्ही पुत्र माजी खासदार  निलेश राणे  आणि आमदार नितेश राणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने गेल्या १०-१२ दिवसांपासून  जोर धरला आहे. त्यातच नारायण राणे व त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्या अहमदाबाद वारीबाबत आणि  वृत्त वाहिन्यांवर व्हायरल झालेल्या फोटोबाबत राजकीय क्षेत्रात गदारोळही निर्माण झाला होता. पण राणेंनी त्या फोटोबाबत खंडन करत आपण  काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात गेलो नसल्याचे स्पष्ट करताना  आपणास भाजपाकडून  ऑफर आल्याचे सांगताना राजकीय संभ्रमावस्था कायम ठेवली आहे.

संदीप खांडगे पाटील
मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे मातब्बर नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत काँग्रेस पक्षाने सावध भूमिका घेतली असून त्यांच्या हालचालीवर  काँग्रेस पक्षाची नजर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

नारायण राणे हे भाजपात जाणार अथवा नाही याबाबत अनेक काँग्रेसचे आमदार व पदाधिकारी सध्या तरी  ‘ऑन द्  रेकॉर्ड’ काहीही बोलण्यास तयार नाहीत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते महादेव  शेलार यांनी  नारायण राणे यांनी ते स्वत:च  काँग्रेस पक्षात असल्याचे सांगितल्यावर  त्यांच्याविषयी उठत असलेल्या वावड्यांवर आपण विश्‍वास ठेवत नसल्याचे सांगितले.

नारायण राणेंसह त्यांचे दोन्ही पुत्र माजी खासदार  निलेश राणे  आणि आमदार नितेश राणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने गेल्या १०-१२ दिवसांपासून  जोर धरला आहे. त्यातच नारायण राणे व त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्या अहमदाबाद वारीबाबत आणि  वृत्त वाहिन्यांवर व्हायरल झालेल्या फोटोबाबत राजकीय क्षेत्रात गदारोळही निर्माण झाला होता. पण राणेंनी त्या फोटोबाबत खंडन करत आपण  काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात गेलो नसल्याचे स्पष्ट करताना  आपणास भाजपाकडून  ऑफर आल्याचे सांगताना राजकीय संभ्रमावस्था कायम ठेवली आहे.

त्यातच माजी खासदार निलेश राणे  यांनी  काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण केले होते. नारायण राणे यांनी दिल्लीत जावून कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेतली होती.

नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत बोलणी झाली असून फक्त पक्ष प्रवेशाबाबतचा मूहूर्त काढणे बाकी असल्याचे  भाजपा गोटातून सांगण्यात येत असले तरी काँग्रेसकडून मात्र त्यावर कोणीही काहीही अधिकृतपणे सांगण्यास तयार  नाही.  याबाबत मुंबईतील नरिमन पॉईट  येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व  प्रवक्ते महादेव शेलार यांनीही नारायण राणे  हे सध्या काँग्रेस पक्षातच असून  त्यांनी तसे स्पष्टही केले आहे.

सूत्रांकडून निर्माण होणार्‍या  राजकीय वावड्यांवर आपण विश्‍वास ठेवत नसल्याचे त्यांनी सांगितले. राणे कॉंग्र्रेस पक्षात असून ते  तसे सांगत असताना  त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबतच्या वावड्यांवर बोलण्यास आपणास काहीही स्वारस्य  नसल्याचे महादेव शेलार यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख