कर्नाटकच्या आमदाराला शोधण्यासाठी यशोमती ठाकूर यांची सेंट जॉर्ज रूग्णालयावर धाड

..
yashomati_thakur_
yashomati_thakur_

मुंबई :  कर्नाटकचे बंडखोर बेपत्ता काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील यांच्या शोधात प्रदेश कार्यध्यक्षा आमदार यशोमती ठाकूर यांनी थेट जेंट जाॅर्ज रूग्णालयात धाड मारल्याने एकच खळबळ उडाली. 

 श्रीमंत पाटील हे  हृदयाचा त्रास होत असल्याने ते  मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचा काॅग्रेसचा दावा आहे. आमदार पाटील यांना भाजपने अमिष दाखवून पळवल्याचा आरोप काॅग्रेसने केला असून त्यांचा शोध घेण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री रूग्णालयात धाव घेतली.

 मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. तर डॉक्टरांकडूनही उडवा-उडवीची उत्तरे देण्यातआली. यावेळी यशोमती ठाकूर यांनी तेथे असलेल्या पोलिसांना कठोर शब्दात सुनावले . 

ज्या रुग्णालयात आमदार पाटील उपचार घेत आहेत त्या रूग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नाहीत, हृदयरोग कक्ष नाही. अशा रुग्णालयात या आमदारावर उपचार कसे होतात? असा 

सवाल यशोमती ठाकूर यांनी केला. दरम्यान या रूग्णालयात आमदार पाटील उपचार घेत नसतील तर एवढा मोठा पोलिस बंदोबस्त कशासाठी ? असा सवालही त्यांनी केला. 

कर्नाटकमधे काॅग्रेस- जेडीएस सरकार घालवण्यासाठी भाजप प्रंचड मोठा घोडेबाजार करत असून महाराष्ट्र सरकारत्याची पाठराखण करत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com