जयश्री पाटील यांच्यासाठी सोनिया गांधींना साकडे

Jayshri Patil
Jayshri Patil

सांगली : सांगली विधानसभेची उमेदवारी कॉंग्रेस नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांना मिळावी म्हणून नगरसेवकांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना साकडे घातले आहे. या पत्राची कॉपी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनाही पाठवली आहे.

सांगलीत भाजपला कडवे आव्हान देण्याची कॉंग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याआधी उमेदवारीचा पेच आहे. कॉंग्रेस सध्या सावध पवित्र्यात आहे. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आपणच उमेदवार असू, असा दावा केला आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावली आहे. जयश्री पाटील यांच्या उमेदवारीसाठी वसंतदादा गट आणि मदनभाऊ गट प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस अंतर्गतच उमेदवारीसाठी संघर्ष पहायला मिळत आहे.

महापालिकेत कॉंग्रेसचे 20 नगरसेवक आहेत. एक स्वीकृत नगरसेवक आहे. या सगळ्यांनी मिळून विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्या नेतृत्वाखाली जयश्री पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी थेट कॉंग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनाच पत्र पाठवले आहे. 

पत्रात म्हटले आहे की, सांगली विधानसभा मतदार संघ हा वसंतदादा घराण्याचा पारंपरिक मतदार संघ आहे. श्रीमती जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीत आम्ही सर्व निवडून आलो. वसंतदादांचे नातू मदन पाटील यांनी या मतदार संघातून अनेकवेळा निवडणूक लढवली आहे. त्यांच्या अकाली निधनानंतर कॉंग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी श्रीमती जयश्रीताई उभ्या राहिल्या आणि त्यांना आधार दिला. आम्हाला जयश्री पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास आहे. त्यांना उमेदवारी द्यावी, आम्ही विजयासाठी जीवाचे रान करू.

पत्रावर उत्तम साखळकर, माजी महापौर हारुण शिकलगार, कांचन कांबळे, वहिदा नायकवडी, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, करीम मेस्त्री, अभिजित भोसले या 21 नगरसेवकांनी सही केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com