गोरेगाव कॉंग्रेसमधील अंतर्गत वादाचा स्फोट, शेकडो कार्यकर्ते भाजपात

गोरेगाव कॉंग्रेसमधील अंतर्गत वादाचा स्फोट, शेकडो कार्यकर्ते भाजपात

गोरेगाव (जि. गोंदीया) : येथील गुरुकृपा लॉनवर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा नुकताच घेण्यात आला. या मेळाव्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 474 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसमधील अंतर्गत वादाचा स्फोट झाल्याने या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्याचे सांगण्यात येते.

भाजपात प्रवेश घेतलेल्यांमध्ये माजी पंचायत समिती सभापती लक्ष्मीकांत बारेवार, नगराध्यक्ष आशीष बारेवार, नगरसेवक चंद्ररेखा कांबळे, श्‍यामली जायस्वाल, रोशनी टेंभूर्णीकर, माजी सरपंच भोजराज बारेवार, डॉ. विजय
पालेवार, सलीम पठाण, सचिन साखरे, जिब्राईल अगवान, विकास बारेवार, संतोष रहांगडाले, नितीन बारेवार, अरविंद जायस्वाल, कुशन चौधरी, संजय घासले, सुधाकर देव्हारे, टीकाराम बावनकर, हरिराम मेश्राम, प्रमिला बिसेन, इंदू गिरेपुंजे, सुरेंद्र सोनवाने, हेमंत मस्करे, देवूलाल कटरे, योगराज भोयर, हिवराज नागवंशी, निशांत खोब्रागडे, अनिल राऊत आदींसह अनेकांचा समावेश आहे.

आमदार रहांगडाले व जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. संचालन रेखलाल टेंभरे यांनी केले. आभार संजय बारेवार यांनी मानले. काचेवानीच्या सरपंच, उपसरपंचासह सदस्यांनीही आमदार विजय रहांगडाले यांच्या कार्यालयात भाजपात प्रवेश घेतला. सरपंच लैगराज मंडारी, माजी उपसरपंच संजय गुनेरीया, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नूरमोहम्मद पठाण, साबिर अली शाह,
सुलतान हुसेन शाह यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. कार्यक्रमाला पवन पटले, राजेश गुनेरीया, संतोष पटले, गायत्री चौधरी, घनश्‍याम पारधी, रिनाईत उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com