जागा अडवून बसलेल्या नेत्यांच्या पक्षत्यागाचा कॉंग्रेस साखर वाटून करणार आनंदोत्सव 

 जागा अडवून बसलेल्या नेत्यांच्या पक्षत्यागाचा कॉंग्रेस साखर वाटून करणार आनंदोत्सव 

पुणे : वर्षानुवर्ष जागा अडवून बसलेले नेते पक्ष सोडून जाऊ लागल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या नेत्यांच्या जाण्यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्यामुळे येत्या शुक्रवारी (ता.6) या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाबरोबरच विरोधी पक्षात देखील हा कार्यक्रम चर्चेचा विषय झाला आहे. 

विधानसभा निवडणुकांना अवघ्या काही दिवसांचा कालवधी राहिला आहे. राष्ट्रवादीबरोबरच कॉंग्रेसमधील काही नेते मंडळी पक्षाला रामराम ठोकत भाजप-शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांची रांग लागल्यामुळे दोन्ही कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेते मंडळींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. असे असताना मात्र पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. 

प्रदेश कॉंग्रेसनेच सचिव संजय बालगुडे यांनी या आनंदोत्सवाचे आयोजन केले आहे. कॉंग्रेसमध्ये राहून वर्षांनुवर्ष सत्ता उपभोगून भाजप-शिवसेनेमध्ये जात आहेत. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये नैराश्‍याचे वातावरण पसरले असल्याचे चित्र रंगविले जात आहे.परंतु वस्तुस्थिती तशी नाही. उलट त्यांच्या जाण्यामुळे कॉंग्रेसपक्ष प्रवाही होत आहे. 

दुसऱ्या फळीतील नेतृत्वाला संधी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी 1978 आणि 1999 मध्ये पक्ष दुभांगल्यावर व नेते सोडून गेल्यावर नेतृत्वाची संधी प्राप्त झाली होती.

त्याचा आनंद साखर वाटून व्यक्त करण्यासाठी अभिनव चौकातील वसंतदादा पुतळा या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता कॉंग्रेसचे एकनिष्ठ नेते मधुकर भावे आणि कै. वसंतदादा पाटील यांचे जुने सहकारी यांच्या उपस्थित हा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे बालगुडे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com