काँग्रेससाठी कर्नाटकातून 'गुड न्यूज'!

धजदला एकाही नगरपंचायतीत स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.
काँग्रेससाठी कर्नाटकातून 'गुड न्यूज'!

बंगळूर : लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्या मतदारांनी नगर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा हात धरल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक जागा व सर्वाधिक स्थानिक संस्थांवर कॉंग्रेसचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. भाजप दुसऱ्या व धजद तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लोकसभा निवडणूक निकालाचा नगर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवर कोणताच प्रभाव दिसून आला नाही. या निकालामुळे लोकसभा निवडणुकीत पाराभूत झालेल्या कॉंग्रेसचे नैतिक बळ वाढले आहे. अनेक स्थानिक संस्थांतून त्रिशंकू स्थिती असली तरी बहुतेक ठिकाणी कॉंग्रेस- धजद युती सत्तेवर येण्याची शक्‍यता आहे.

30 नगरपरिषदांच्या निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वाधिक 12, भाजपला 6 व धजदला 2 ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 10 नगर परिषदांमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. 19 पैकी 8 नगरपंचायतींत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. कॉंग्रेसला तीन नगर पंचायतींतून बहुमत मिळाले असून 8 ठिकाणी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. धजदला एकाही नगरपंचायतीत स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. 

सात नगरपालिकांच्या निवडणूक निकालात कॉंग्रेसला दोन ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजप व धजदला एकाही नगरपालिकेत बहुमत मिळालेले नाही. पाच नगरपालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

नगरपरिषदांच्या 248 प्रभागांपैकी भाजप 56, कॉंग्रेस 90, धजद 38, बीएसपी 2, अपक्ष 25 आणि इतर 6 जण विजयी झाले आहेत. नगरपरिषदेच्या एकूण 783 प्रभागांपैकी भाजपने 184 जागा जिंकल्या आहेत. कॉंग्रेस 322, धजद 102, बसपा 1, सीपीआय 2, अपक्ष उमेदवार 102 प्रभागात विजयी झाले आहेत. नगर पंचायतीतील 132 प्रभागांपैकी भाजप 126, कॉंग्रेस 97, धजद 34 आणि अपक्षांनी 40 प्रभागात विजय मिळविला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com