'व्हायरल झालेली कॉंग्रेसची यादी अधिकृत नाही'

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याला सुरवात झाली असतानाच काल दुपारी 4 वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या उमेदवारांची एक यादी व्हायरल झाली. यावर केंद्रीय निवडणूक समितीचे प्रमुख मुकुल वासनिक याची सही नाही. या यादीवरून काल संध्याकाळपासून दिल्लीत घमासान सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाळू धानोरकर
बाळू धानोरकर

नागपूर : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याला सुरवात झाली असतानाच काल दुपारी 4 वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या उमेदवारांची एक यादी व्हायरल झाली. यावर केंद्रीय निवडणूक समितीचे प्रमुख मुकुल वासनिक याची सही नाही. या यादीवरून काल संध्याकाळपासून दिल्लीत घमासान सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

विशेष म्हणजे कॉंग्रेसच्या छाननी समितीने ठरविलेली काही नावेही या यादीमध्ये आहेत. त्यामुळे ही यादी कुणी आणि कुठून लीक केली, याचा शोध केंद्रीय निवड समिती घेत आहे. छाननी समितीच्या यादीत असलेली नावे काल रात्रीपासून मागे पडत चालली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या यादीमध्ये जातीनिहाय उमेदवारी दिल्याचे दर्शविले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे विदर्भातील एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी ही यादी बरोबर असल्याचे काल म्हटले होते. आज 'सरकारनामा' ने त्यांच्याशी संपर्क साधला असता, 'व्हायरल झालेली यादी अधिकृत नाही'' असे त्यांनी सांगितले. 

काँग्रेसच्या प्रवक्त्यांनीही ही यादी अधिकृत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही यादी कुणी व्हायरल केली याचा शोध कॉंग्रेसची केंद्रीय निवडणूक समिती घेत आहे. केंद्रीय निवडणूक समितीची बैठक उद्या आयोजित आहे. त्यानंतर सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. या घटनाक्रमामुळे आधीच निवड झालेल्या काही उमेदवारांची नावे मागे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com