Congress Vilas Muttemwar Nagpur Municipal Corporation election | Sarkarnama

नागपुरात मुत्तेमवार गटाची सरशी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 मार्च 2017

नागपूर : नागपूर शहर काँग्रेसमधील वादामध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार गटाची सरशी झाली आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांची काँग्रेस पक्षश्रेष्ठीने कोणतीही दखल न घेता मुत्तेमवार गटाला अभय दिले आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये सुरू असलेले मतभेद मिटण्याची कोणतीही शक्‍यता नसून विरोधी पक्षनेतेपदावरून आता नव्याने वाद उद्भवला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावला. 

चतुर्वेदी-राऊत गटाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी अ. भा. काँग्रेस समितीकडे केली आहे. या मागणीची पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कोणतीही दखल घेतली नाही. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनीही या गटाला भेटीची वेळ दिली नाही. दिल्ली व मुंबईहून या असंतुष्ट गटाला प्रतिसाद न मिळाल्याने हा गट आता शांत झाला आहे. 

विरोधी पक्षनेतेपदासाठी चतुर्वेदी-राऊत गटाचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांचे नाव आघाडीवर होते. ते ज्येष्ठ व अभ्यासू नगरसेवक म्हणून शहरात परिचित आहेत. परंतु गुडधे पाटील काँग्रेस पक्षाच्या कोणत्याच बैठकांना हजर राहत नाही. विकास ठाकरे यांचे कट्टर विरोधक असल्याने गुडधे पाटील यांचे नाव या शर्यतीतून बाद झाले. काँग्रेसच्या गटबाजीमध्ये मुत्तेमवार गटाने चतुर्वेदी-राऊत गटावर मात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख