रामटेकमध्ये कॉंग्रेसचा 'अंडरकरंट' शिल्लक 

कृपाल तुमाने यांनी सलग दुसरा विजय नोंदवीत रामटेकचा गड शिवसेनेकडे कायम राखला असला तरी कॉंग्रेसच्या किशोर गजभिये यांनी त्यांना कडवी झुंज दिली. मागील निवडणुकीच्या तुलनेते कॉंग्रेसच्या मतांमध्ये १ लाख २६ हजारांची भर पडली. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काही भागांतून कॉंग्रेस चांगलीच आघाडी मिळाली आहे. यामुळे कॉंग्रेसमध्ये अंडरकरंट शिल्लक असल्याची चर्चा रंगली आहे.
रामटेकमध्ये कॉंग्रेसचा 'अंडरकरंट' शिल्लक 

नागपूर : कृपाल तुमाने यांनी सलग दुसरा विजय नोंदवीत रामटेकचा गड शिवसेनेकडे कायम राखला असला तरी कॉंग्रेसच्या किशोर गजभिये यांनी त्यांना कडवी झुंज दिली. मागील निवडणुकीच्या तुलनेते कॉंग्रेसच्या मतांमध्ये १ लाख २६ हजारांची भर पडली. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काही भागांतून कॉंग्रेस चांगलीच आघाडी मिळाली आहे. यामुळे कॉंग्रेसमध्ये अंडरकरंट शिल्लक असल्याची चर्चा रंगली आहे. 

रामटेक लोकसभा मतदारसंघात नागपूर शहर वगळता संपूर्ण जिल्ह्याचा समावेश होतो. एकाच चिन्हावर सलग दुसऱ्यांदा रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारे ते माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव नंतर दुसरे उमेदवार ठरले आहेत. जिल्हा कॉंग्रेस गटबाजीत विभागली असून नियंत्रणाबाहेर असल्याचे चित्र या निवडणुकीत दिसले नाही. किशोर गजभिये यांचा प्रचार सर्वच कॉंग्रेस व आघाडीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याचमुळे किशोर गजभिये यांनी ४ लाख ७० हजार ३४३ मते घेतली. सावनेरमधून तुमाने यांना फार जास्त आघाडी मिळाली नाही.

याशिवाय कामठी, रामटेक व हिंगणा विधानसभा मतदारसंघात काही फेऱ्यात कॉंग्रेसचे गजभिये समोर होते. यामुळे लोकांनी गजभिये यांच्यावर विश्‍वास दाखविला, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. रामटेकमध्ये जरी कॉंग्रेसचा पराभव झाला असला तरीदेखील वाढलेल्या मतामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांत विश्‍वास कायम आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसला योग्य व आक्रमक नेतृत्व मिळाल्यास विधानसभेत त्याचा फायदा होईल, असे मत कॉंग्रेस समर्थक नोंदवीत आहेत. 

कॉंग्रेसमध्ये रामटेकच्या उमेदवारीवरून राजकीय नाट्य जिल्हा कॉंग्रेसमध्ये रंगले होते. यामुळे गटबाजीची मरगळ कॉंग्रेस काढून फेकणार नाही, अशी चर्चा रंगली. मुकुल वासनिक यांनी किशोर गजभिये यांना वेळेवर उमेदवारी दिली. यामुळे मुकुल वासनिक यांनी लादलेला उमेदवार असल्याने त्याचा फटका बसेल, अशी चर्चा कॉंग्रेसमध्ये रंगली. मात्र, ती फोल ठरली. किशोर गजभियेंच्या प्रचारासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते एकवटले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com