भाजप जातीयवादी असल्याचा आरोप करण्यास कॉंग्रेसवाल्यांनी शिकविले : रामदास आठवले 

congress teach me bjp is castist party ramdas athawale
congress teach me bjp is castist party ramdas athawale

नगर :भारतीय जनता पक्ष जातीयवादी असल्याचा आरोप करण्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादीने शिकविले होते, मात्र प्रत्यक्षात तसे नाही. गेल्या पाच वर्षाच्या अनुभवावरून सांगतो, भाजप-शिवसेना जातीयवादी नाहीत, असा निर्वाळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगमनेर येथे दिला. 

संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी विधानसभेतील आपल्या भूमिकेविषयी माहिती दिली. राहुल गांधी यांचा खरपूस शब्दांत त्यांनी समाचार घेतला. राहुल गांधी कधीच पंतप्रधान बनू शकत नाहीत, असे सांगून त्यांनी कॉंग्रेसवर निषाणा साधला. कॉंग्रेसने निष्कारण समाजात तेढ निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला धर्मग्रंथ मानणारे आहेत. संविधानाचे संरक्षण करण्यास आपण समर्थ आहोत, असे आठवले यांनी सांगितले. 

... तर प्रकाश आंबेडकर मंत्री होतील 
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर भाजपबरोबर आल्यास त्यांचे स्वागतच होईल. ते आले, तर मंत्री बनतील. कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर वंचित आघाडी गेली, तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगून आठवले यांनी आंबेडकरांना डिवचले. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com