काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या दुष्यंत चतुर्वेदींना पाठिंबा देण्याची काँग्रेसवर वेळ 

आज दुष्यंत चतुर्वेदी उमेदवारी अर्ज भरला आहे.काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्यादुष्यंत चतुर्वेदींना पाठिंबा देण्याची काँग्रेसवर वेळ आली आहे .
Dushyant-Chaturvedi
Dushyant-Chaturvedi

मुंबई  : शिवसेनेने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत यांना तानाजी सावंत यांची रिक्त जागा दिली आहे. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे  आज दुष्यंत चतुर्वेदी उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या  दुष्यंत चतुर्वेदींना पाठिंबा देण्याची काँग्रेसवर वेळ आली आहे . 

 
तानाजी सावंत यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आले होते. सावंत आता ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. आता त्यांच्या जागी दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून आज दुष्यंत चतुर्वेदी उमेदवारी अर्ज भरला आहे.

शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यापूर्वी माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. 

 दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज सादर करताना  गृहमंत्री अनिल देशमुखजी,शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर ,ऊर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत  ,माजी मंत्री डॉ सतिश चतुर्वेदी, मंत्री संजय राठोड़ , खासदार बाळू  धानोरकर, माणिकराव ठाकरे , मनोहर नाईक ,वसंत पुरके ,शिवाजीराव मोघे आदी मान्यवर नेते हजर होते . 

दुष्यंत चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. दुष्यंत चतुर्वेदी हे कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव आहेत. सतीष चतुर्वेदी हे विदर्भाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. ते 25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री होते. विदर्भात सतीष चतुर्वेदी यांचा मोठा जनसंपर्क आहे.


भाजपची तयारी
दरम्यान, भाजपकडून सुमित बाजोरिया अर्ज भरणार आहेत. त्यामुळे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेसाठी आता दुष्यंत चतुर्वेदी विरुद्ध सुमित बाजोरिया अशी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार मितेश भांगडीया आणि शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कन्हेरे यांच्या नावाचीही चर्चा होती.

कन्हेरे भाजपच्या गोटात गेल्यास शिवसेनेसाठी हा मोठा फटका असेल अशी चर्चा होती. यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेत चांगलीच चुरस सुरु आहे. भाजपने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com