छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात काँग्रेस आक्रमक, उद्या राज्यभर तीव्र आंदोलन 

'आजके शिवाजी :नरेंद्र मोदी'या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे
Congress Statewise Agitation aginst BJP Tommorrow Informs Balasaheb Thorat
Congress Statewise Agitation aginst BJP Tommorrow Informs Balasaheb Thorat

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही 'आजके शिवाजी :नरेंद्र मोदी' या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

''भाजपाच्या खोडसाळपणाचा समाचार घेताना थोरात म्हणाले, "व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी CAA आणि NRC च्या माध्यमातून देशाला वेठीस धरणारे, धार्मिक तेढ निर्माण होईल अशा भूमिका घेणारे,नोटबंदीच्या माध्यमातून सामान्य जनतेला वेठीस धरणारे आणि महत्वाचे म्हणजे हुकूमशाही पद्धतीने कारभार करू इच्छिणाऱ्या नरेंद्र मोदींची कोणत्याच अर्थाने छत्रपती शिवरायांसोबत तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. नरेंद्र मोदी मात्र जाती धर्मात तेढ आणि विद्वेषाचे काम करत आहे. त्यामुळे महाराजांच्या नखाचीही सर मोदींना येणार नाही,'' असेही थोरात म्हणाले.

''शिवस्मारकातही घोटाळा करणाऱ्या भाजपला खरेतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेण्याचा नैतिक अधिकार नाही. भाजपच्या या खोडसाळपणाचा काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर निषेध केला जाणार आहे. उद्या मंगळवार, ता. १४  जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, मुंबई येथे भाजपाविरोधात आपण स्वतः कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असून राज्यातील सर्वच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा व तालुकास्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात तीव्र आंदोलन करतील,'' असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com