आरशात पाहा; विरोधी पक्षनेता दिसेल; बाळासाहेब थोरातांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा विरोधी पक्षनेता वंचित आघाडीचा असेल, असे वक्तव्य केले होते. याबाबत आज थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री सर्वच बाबतीच भविष्य वर्तवतात. विरोधी पक्ष कुठला असेल, विरोधी पक्ष नेता कोण असेल. ही त्यांच्या प्रचाराची पद्धत आहे...
Devendra Phadanavis - Balasaheb Thorat
Devendra Phadanavis - Balasaheb Thorat

कोल्हापूर : ''निवडणुकीत काय होणार, विरोधी पक्ष कोणता असणार, विरोधी पक्षनेता कोण असेल या सर्वच गोष्टींवर मुख्यमंत्री भविष्य वर्तवत आहेत. ती त्यांच्या प्रचाराची पद्धत आहे; पण त्यांनी स्वतःला आरशात पाहावे. म्हणजे त्यांना विरोधी पक्ष नेता कोण असेल हे कळेल,'' असा टोला महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. कॉंग्रेस कमिटी कार्यालयाच्या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा विरोधी पक्षनेता वंचित आघाडीचा असेल, असे वक्तव्य केले होते. याबाबत आज थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, "मुख्यमंत्री सर्वच बाबतीच भविष्य वर्तवतात. विरोधी पक्ष कुठला असेल, विरोधी पक्ष नेता कोण असेल. ही त्यांच्या प्रचाराची पद्धत आहे; पण त्यांनी स्वतःला आरशात पहावे. त्यांना विरोधी पक्षनेता दिसेल. आम्ही धर्मनिरपेक्ष मित्र पक्षांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. काही जागांबद्दल निश्‍चिती झाली आहे. उर्वरीत जागांसाठी मंगळवारी बैठक आहे. लवकरच आमची पहिली यादी जाहीर होईल. मोठे संख्याबळ घेऊन आम्ही सत्ता स्थापन करू.'' कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार सतेज पाटील, मल्लीकार्जून खर्गे यावेळी उपस्थित होते. 

'त्यांच्या' उमेदवारीनंतर निर्णय 
विधान परिषदेचे काही सदस्य विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत. याबाबत विचारले असता थोरात म्हणाले, "विधान परिषदेच्या सदस्यांबाबत आम्ही अद्याप विचार केलेला नाही. कॉंग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ. कारण विधान परिषदेमध्ये संख्याबळ टिकवणेही महत्त्वाचे आहे.'' 

कमजोर लोक पक्ष बदलतात 
खरगे म्हणाले, "केंद्र सरकार इडी, इनकमटॅक्‍स यांची भीती दाखवून कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेत आहे. जे कमजोर आहेत ते पक्षांतर करतात. मात्र जे खंबीर आहेत. आपल्या विचारधारेवर विश्‍वस ठेऊन आहेत. ते पक्ष बदलत नाहीत.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com