Congress Shivsena Alliance in Malegaon Mayor Election | Sarkarnama

मालेगाव महानगरपालिका महापौर निवडणुक काँग्रेस-शिवसेना आघाडी कायम

प्रमोद सावंत 
शनिवार, 7 डिसेंबर 2019

येत्या 12 डिसेंबरला मालेगाव महापौर निवडीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा होणार आहे. काँग्रेसचा महापौर होणार असून महापौर पदासाठी ताहेरा शेख यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

मालेगाव : महानगरपालिकेत काँग्रेस- शिवसेना युती आगामी महापौर निवडणुकी साठीही कायम राहणार आहे. आमदार दादा भुसे, महापौर रशीद शेख आदींसह प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत झाले हा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या 12 डिसेंबरला महापौर निवडीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा होणार आहे. काँग्रेसचा महापौर होणार असून महापौर पदासाठी ताहेरा शेख यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. शिवसेनेला उपमहापौरपद व स्थायी समितीचे एक वर्ष सभापतीपद देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

उपमहापौर पदासाठी मात्र नाव निश्चित झालेले नाही. भुसे सुचवतील त्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपचे नगरसेवकही विकासकामांसाठी याच गटात राहण्याची शक्यता आहे. महागटबंधन आघाडीचा यामुळे हिरमोड झाला आहे. एमआयएम मुळे त्यांच्या समोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. राज्यातील परिवर्तनाचाही परिणाम इथल्या राजकारणावर झाला आहे. उपमहापौर कोण होणार याविषयी उत्सुकता असून महापौर पदासाठी काँग्रेसच्या ताहेरा शेख व महागटबंधन आघाडीच्या शानेहिंद निहाल अहमद यांच्यात लढत होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख