congress request raju shetty to attend cm ceremoney | Sarkarnama

  तीन राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाचे कॉग्रेसकडून राजू शेट्टींना निमंत्रण 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 डिसेंबर 2018

कोल्हापूर : मध्यप्रदेश , राजस्थान व छत्तीसगड येथील मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण कॉंग्रेसच्यावतीने शेतकरी नेते आणि खासदार राजू शेटटी यांना दिले आहे. 

देशात खासदार राजू शेटटी यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर गेल्या दीड वर्षात देशभर आंदोलन उभे केले आहे. दिल्लीमध्ये देशातील शेतकरी संघटनांना एकत्रित करून संसदेला घेराव घालत सरकारच्या शेती विरोधातल्या धोरणांवर आवाज उठवण्यात शेट्टी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. 

मंदसौरमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार व त्यामध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांची अस्थिकलश यात्रा घेऊन देशातील काही राज्यामध्ये जनजागृतीसाठी किसान मुक्ती यात्रा काढली व त्याचा समारोप दिल्ली झाला होता. शेतकरी प्रश्‍नावर शेट्टी हे केंद्र सरकारवर सातत्याने टीका करीत आहेत. 

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार पाय उतार होण्यास शेतकरी हे ही एक महत्त्वाचे कारण आहे. शेट्टी यांनी गेल्या चार वर्षात मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. यापूर्वी त्यांनी राहुल गांधींचीही भेट घेतली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर शेट्टी यांचे कॉंग्रेसला विस्मरण होणे अशक्‍यच होते. तीन राज्यातील शपथविधि समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण त्यांना देण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख