Ramesh Jarkiholi - Shrimant Patil - Mahesh Kumthalli Congress Rebels From Belgaum
Ramesh Jarkiholi - Shrimant Patil - Mahesh Kumthalli Congress Rebels From Belgaum

बेळगावमधील काँग्रेस बंडखोरांना भाजपची उमेदवारी

कर्नाटकात निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा होताच कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांनी आज (ता.14) बंगळूरमध्ये भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील तिघा बंडखोर कॉंग्रेस आमदारांचा समाविष्ट आहे.

बेळगाव : कर्नाटकात निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा होताच कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांनी आज (ता.14) बंगळूरमध्ये भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील तिघा बंडखोर कॉंग्रेस आमदारांचा समाविष्ट आहे. 

गोकाक येथून रमेश जारकीहोळी, अथणीतून महेश कुमठळ्ळी आणि कागवाड संघातून श्रीमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दरम्यान अपात्र आमदार संदर्भात सर्वोच्च न्यायालयात निकाल घोषित झाला. अपात्रांना निवडणूक लढण्यासाठी मुभा दिली. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस आणि धजदच्या बंडखोर आमदारांनी भाजपात आज (ता.14) प्रवेश केला. 

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि भाजप नेत्यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला. त्यानंतर उमेदवारी घोषित करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील तीन मतदार संघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. गोकाकला रमेश जारकीहोळी, अथणीमधून कुमठळ्ळी आणि कागवाड येथून पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

भाजप राष्ट्रीय कार्यकारणीत विषयावर चर्चा झाली. अंतिम निर्णय घोषित झाला. त्यानुसार भाजपचे सरचिटणिस अरुणसिंग यांनी आज (ता.14) उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्याबाजी मारलेल्या उमेदवारांना 'कमळ' चिन्हांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. साऱ्यांचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com