आले तर सोबत; अन्यथा कॉंग्रेसचे एकला चलो 

महाविकास आघाडीतील पक्ष सोबत आले तर महापालिकेची निवडणुका एकत्रित लढू; अन्यथा कॉंग्रेसची संपूर्ण ११५ जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हा नियोजन मंडळ तयार करून नियोजन केले जात असल्याचे महापालिका निवडणूक निरीक्षक मुजफ्फर हुसेन यांनी शनिवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत सांगितले.
congress ready to contest aurangabad municipal corporation election without alliance
congress ready to contest aurangabad municipal corporation election without alliance

औरंगाबाद : महाविकास आघाडीतील पक्ष सोबत आले तर महापालिकेची निवडणुका एकत्रित लढू; अन्यथा कॉंग्रेसची संपूर्ण ११५ जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हा नियोजन मंडळ तयार करून नियोजन केले जात असल्याचे महापालिका निवडणूक निरीक्षक मुजफ्फर हुसेन यांनी शनिवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत सांगितले. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा शहागंज येथील गांधीभवनात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना श्री. हुसेन म्हणाले, ‘‘शहरात अनेक प्रश्‍न आहेत. रस्ते, पाणी, कचरा, कर कमी करणे या विषयावर मेळाव्यात चर्चा झाली. या चर्चेच्या आधारावर महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा जाहीरनामा तयार केला जाईल. 

महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याची कॉंग्रेसची तयारी आहे; मात्र सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत किंवा आमच्या सोबत कोणी आले नाही तर ११५ जागा लढण्याची तयारी पक्षाने केली आहे, अशा इशारा हुसेन आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला दिला. 

आक्षेपांची आयोगाने दखल घ्यावी 
महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्ड रचनेत मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आले असून, त्यावर आक्षेपही घेण्यात आलेले आहेत. सलग पाच वॉर्डात आरक्षणे टाकण्यात आली आहेत. कॉंग्रेसच्या विचारांचे मतदार अनेक वॉर्डात विभागले गेले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने या आक्षेपांची योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी मुज्जफर हुसेन यांनी केली. 

औरंगाबादची निवडणूक महत्त्वाची 
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद महापालिकेची निडणूक महत्त्वाची असून, या निवडणुकीनंतर मराठवड्यातील ३० नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पक्षासाठी ही निवडणूक परिणामकारक ठरणार आहे, असे दादासाहेब मुंडे म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com