Congress Reaction on Supreme Court Verdict on Rammandir | Sarkarnama

राममंदीराचे राजकारण करण्याची आता गरज उरणार नाही : काँग्रेसचा भाजपला टोला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

काँग्रेस पक्षाने राममंदीराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. भाजप व अन्य पक्षांना आता राममंदीराच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याची गरज पडणार नाही, असा टोलाही पक्षाचे प्रवक्ते राजदीप सुरजेवाला यांनी या बाबत प्रतिक्रिया देताना लगावला आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने राममंदीराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. भाजप व अन्य पक्षांना आता राममंदीराच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याची गरज पडणार नाही, असा टोलाही पक्षाचे प्रवक्ते राजदीप सुरजेवाला यांनी या बाबत प्रतिक्रिया देताना लगावला आहे. 

अयोध्येतील वादग्रस्त जागी मशिद नव्हती. तिथे राममंदीराचे अवशेष होते असे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने ही जागा राममंदीर न्यासाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहे. सुमारे १३४ वर्षांनंतर राममंदीर- बाबरी मशिद वादावर निकाल देण्यात आला आहे.

सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने हा निकाल दिला आहे. ट्रस्ट स्थापून मंदीर बांधण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पाच एकर जागा पर्यायी म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निकालाने जल्लोष केला जात आहे. घटनापीठाने हा निर्णय एकमताने दिला आहे. त्यावर काँग्रेस पक्षातर्फे वरील प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख