`सत्ता आली..आता काॅंग्रेस कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवू नका...`

..
mallikarjun kharge and congress party workers
mallikarjun kharge and congress party workers

नागपूर : महाराष्ट्रात कॉंग्रेस महाआघाडीची सत्ता आली आहे, हे कार्यकर्त्यांनासुद्धा जाणवले पाहिजे. याकरिता मंडळ, समित्या, विविध पदे व जबाबदाऱ्यांचे वाटप करण्याचा सल्ला कॉंग्रेसच्या नेत्यांना महाराष्ट्राचे प्रभारी तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिला.

गुरुवारी विधानभवन परिसरातील कॉंग्रेस पक्ष कार्यालयात खर्गे यांच्या उपस्थितीत व विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस आमदारांची बैठक घेण्यात आली.

कॉंग्रेसच्या विजयात कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. ते सातत्याने पक्षासाठी झटत असतात. विजयी झाल्यानंतर तसेच सत्ता आली की नेत्यांना त्यांचा विसर पडतो. त्यामुळे पक्षाला फटका बसतो. चारदोन जणांना मंत्रिपद दिल्याने पक्ष बळकट होत नाही. हे लक्षात घेऊन सत्तेचा लाभ कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा. त्यांनाही राज्यात आपली सत्ता आली आहे हे जाणवू द्या, असा सल्ला खर्गे यांनी दिला.

बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री डॉ. नितीन राऊत, विधान परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे, कॉंग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव वामशी चंद रेड्डी, आशीष दुआ, सोनल पटेल, संपतकुमार, बी. एम. संदीप, आमदार अमित देशमुख, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजित कदम, मुझफ्फर हुसेन, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, रामकिशन ओझा यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com