`महाजनादेश'च्या मागे लागणार कॉंग्रेसची पोलखोल यात्रा 

`महाजनादेश'च्या मागे लागणार कॉंग्रेसची पोलखोल यात्रा 

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा उद्यापासून नांदेडमधून सुरु होत आहे. यापाठोपाठच कॉंग्रेसची पोलखोल यात्रा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात सुरु होणार आहे. त्यानंतर 26 ऑगस्टपासून माजी खासदार आणि कॉंग्रेसच्या कॅम्पेन कमिटीचे प्रमुख नाना पटोले यांच्या नेतृत्वात अमरावतीमधून पोलखोल यात्रेचा शुभारंभ कॉंग्रेसतर्फे करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी आज "सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

"महाजनादेश'च्या मागोमागच "पोलखोल' असल्याने सरकारने केलेली जी कामे मुख्यमंत्री जनतेला सांगतील, त्याचीच पोलखोल कॉंग्रेसची यात्रा करणार असल्याचे समजते. 

तत्पूर्वी 22 ऑगस्टला दिल्लीत माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

नाना पटोलेंच्या पोलखोल यात्रेवरुन कॉंग्रेसमध्येच मतभेद, नाराजी असल्याची चर्चा आज पसरली होती. "विधानसभा निवडणुकीआधीच कॉंग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. नाना पटोले यांच्या 'पोलखोल' यात्रेवरुन पक्षात नाराजी आहे. यात्रेबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता आयोजन केल्यामुळे कॉंग्रेस नेते नाराज आहेत. नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीआधीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, आता विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी यात्रेचं आयोजन केले. यात्रेच्या नियोजनात कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना विचारले नाही, प्रचाराबाबत अजून ठोस कार्यक्रम नाही, त्यामुळे ही नाराजी आहे.

दरम्यान, नाना पटोले कॉंग्रेसच्या कॅम्पेन कमिटीचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांची कार्यपद्धती कॉंग्रेसमधील नेत्यांना पटत नाही', अशी माहीती आज समाजमाध्यमांवर पसरली होती. यासंदर्भात नाना पटोले यांना विचारणा केली असता, त्यांनी "सरकारनामा'ला उपरोक्त माहीती दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com