Congress politics | Sarkarnama

कॉंग्रेसच्या नेतृत्वात विरोधक एकत्र येतील? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 मार्च 2017

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या धोरणाबाबत राज्य सरकारची असलेल्या उदासीनतेच्या विरोधात कॉंग्रेसच्या नेतृत्वात विरोधक एकत्र येईल काय, असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. 

नागपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या धोरणाबाबत राज्य सरकारची असलेल्या उदासीनतेच्या विरोधात कॉंग्रेसच्या नेतृत्वात विरोधक एकत्र येईल काय, असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. 

महाराष्ट्र विधिमंडळाने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशी विधिमंडळात मागणी केली होती. या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या आंदोलनामुळे विरोधी पक्षाच्या 19 सदस्यांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आले. या घटनेच्या विरोधात आता राज्यातील जनतेमध्ये जागृती करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित येऊन विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन सरकारचा विरोध करण्याचा हा गेल्या काही वर्षातील पहिलाच प्रयत्न आहे. परंतु सर्व विरोधक एकत्र येतील काय? 

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्‍यातील पळसगाव येथील या यात्रेला सुरवात होणार आहे. कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील हे गाव आहे. विदर्भात या यात्रेवर कॉंग्रेसचे वर्चस्व राहणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएम, रिपब्लिकन पक्ष, शेकाप या पक्षांचा फारसा प्रभाव नसल्याने विदर्भात या यात्रेवर कॉंग्रेस पक्षाचाच प्रभाव राहणार आहे. 

पळसगाव येथे 29 मार्चला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार विजय वडेट्टीवार, कॉंग्रेसचे विदर्भातील बहुतेक सर्व आमदार पळसागावला जाणार आहेत. पळसगाव येथील यात्रा धडाकेबाजपणे निघणार आहे. परंतु तेथून पुढे विदर्भात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ही यात्रा पुढे रेटावी लागणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख