फौजिया खान यांच्या खासदारकीच्या वाटेत काॅंग्रेसने पेरले काटे

....
foujaiya khan
foujaiya khan

मुंबई : नागपुरातील कॉंग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांचे नाव राज्यसभेसाठी पुन्हा पुढे आले असून येत्या दोन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब व्हावे असे प्रयत्न  केले जाणार आहेत.

चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत शिवसेनेच्या माध्यमातून विधान परिषदेवर निवडून आले आहेत. मुख्यमंत्री तसेच  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दुष्यंत यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. शिवसेनेची अतिरिक्त मते चतुर्वेदी यांना मिळतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.

पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कानावर हे समीकरण घालण्यासाठी लवकरच एक शिष्टमंडळ दिल्ली गाठणार आहे. आघाडीत कॉंग्रेसला गृहीत धरले जात असून राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीला देणे अमान्य असल्याचे सोनिया गांधी यांनी आज जाहीर केल्याने या गटाला बळ आले आहे. वादात न पडता ती जागा राष्ट्रवादीला द्यावी, असा प्रस्ताव काही बड्या नेत्यांनी मांडला होता; पण तो मान्य झाला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com