गटबाजी करण्यासाखी आज काँग्रेसची स्थिती नाही : अशोक चव्हाण 

चव्हाण यांचे आज पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी युवक काँग्रेस, एनएसयुआय तसेच सेवादल यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहूल दिवे आणि माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सध्या शहर व जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी सुरु असलेल्या 'काँग्रेस जोडो' अभियानाची माहिती दिली.
गटबाजी करण्यासाखी आज काँग्रेसची स्थिती नाही : अशोक चव्हाण 

नाशिक : "पक्ष वाढवायचा असेल तर सर्वांना बरोबर घेऊन काम करा. गटबाजी करण्यासारखी सध्याची काँग्रेसची स्थिती नाही," असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आज येथे सांगितले. 

चव्हाण यांचे आज पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी युवक काँग्रेस, एनएसयुआय तसेच सेवादल यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहूल दिवे आणि माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सध्या शहर व जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी सुरु असलेल्या 'काँग्रेस जोडो' अभियानाची माहिती दिली. सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन एकत्रीत दौरा केला जातो. त्यात लोकांना काँग्रेसशी जोडण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. याची माहिती त्यांनी दिली. त्याबाबत चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. 

महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी मल्लिकाअर्जुन खरगे यांच्या उपस्थितीत उद्या (ता. 8) मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमासाठी येण्याचे आमंत्रण चव्हाण यांनी या पदाधिकाऱ्यांना. नाशिकमध्ये सुरु असलेल्या काँग्रेस जोडो अभियानासंदर्भात खरगे यांच्याशीही चर्चा करुन असे चव्हाण यावेळी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com