पुरंदरमध्ये काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची गळती सुरूच : दौंडज, सोनेरीतील कार्यकर्ते सेनेत

पुरंदरमध्ये काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची गळती सुरूच : दौंडज, सोनेरीतील कार्यकर्ते सेनेत

सासवड ः पुरंदर तालुक्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. हिवरे, फुरसुंगी, राजुरी, वीर, सासवडच्या कित्येक बड्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाच त्याशिवाय आजही विविध गावातून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गावोगावी मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक गावातील आघाडीचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दौंडज कार्यकर्त्यांनी तर सासवडला येऊन प्रवेश केला. तर आजच्या सोनोरी भेटीत तेथील कार्यकर्यांनी प्रवेश केला. 

दौंडज (ता. पुरंदर) येथील माजी सरपंच ज्ञानदेव कदम, उमेश इंदलकर, शरद जाधव, तुषार बांदल, वरूण भोईटे, प्रशांत जाधव, नितीन जाधव, संतोष दगडे, सोनबा दगडे, अविनाश कदम, किरण कदम, अशोक जगताप, अविनाश माळवदकर, दिपक नलावडे, सचिन जाधव, सचिन इंदलकर यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी व इतर पक्ष सोडत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत राज्यमंत्री शिवतारे यांनी केले. 

सोनोरी (ता. पुरंदर) गावातून शांताराम शेळके, प्रगतीशील शेतकरी सर्जेराव काळे, अजय काळे, दिपक आटेकर, सुदाम काळे, विकास काळे, किरण शेळके, पांडुरंग काळे, अनिकेत काळे, आकाश काळे, संपत काळे, दत्तात्रय काळे, मधुकर काळे, लीलाबाई काळे, लक्ष्मी काळे, रणजीत काळे, बबन काळे, उत्तम काळे, निलेश काळे, प्रमोद काळे, संदिप काळे, अमोल काळे, नितीन म. काळे, संतोष काळे आदींनी कॉंग्रेस - राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला.

यानिमित्ताने बोलताना सभापती रमेश जाधव म्हणाले की शिवतारे यांच्या माध्यमातून गावागावात विकासाची मोठी कामे झाली आहेत. कॉंग्रेसचे तालुक्यात एकही काम नाही. उलट गुंजवणीसारख्या पवित्र कामात अडथळे आणण्याचे महापाप कॉंग्रेसच्या नेत्यांनी केले. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला मतदान म्हणजे पुरंदरच्या मातीशी गद्दारी करणारांना मतदान ही बाब मतदारांनी नेमकी हेरली आहे. त्याचा हा परिणाम आहे. यापूर्वीही हिवरे, फुरसुंगी, राजुरी, वीर, सासवडच्या कित्येक बड्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाच आहे.  यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दिलीप यादव व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com