नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे नऊ उमेदवारी आघाडीवर

या व्यतिरिक्त अपेक्षेप्रमाणे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांची घौडदौड सुरूच आहे.
नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे नऊ उमेदवारी आघाडीवर

नगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांपैकी नऊ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. त्यातील राष्ट्रवादीचे ६ व राष्ट्रवादी पुरस्कृत १ तर काँग्रेसचे २ उमेदवारांचा समावेश आहे. भाजप-शिवसेना केवळ तीन जागांवर मताधिक्यात आहेत.
 
नगर जिल्ह्याचा निकाल धक्कादायक लागेल, हा कयास खरा ठरत आहे. भाजपचे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बबनराव पाचपुते हे विजयी होतील, हा बहुतेकांचा अंदाज चुकीचा नाही, मात्र आमदार मोनिका राजळे यांनीही मताधिक्य तोडत १० व्या फेरीत आघाडी घेतली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड येथील उमेदवार रोहित पवार यांनी तब्बल दहा हजार ५०० मतांनी आघाडी घेत भाजपचे उमेदवार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना हादरा दिला आहे. अकोले येथेही भाजपमध्ये गेलेले आमदार वैभव पिचड यांना धक्का देत राष्ट्रवादीचे उमेदवार  किरण लहामटे यांनी पहिल्या आठ फेरीमध्ये १६ हजार मतांची आघाडी घेतली आहे. कोपरगावला आशुतोष काळे यांनी २२ हजार मतांची आघाडी घेत भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांना पिछाडीवर टाकले आहे. राहुरी विधानसभा मतदार संघाचा निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे. गेले २५ वर्षे आमदारकी केलेल्या भाजपच्या आमदार शिवाजी कर्डिले यांना मागे टाकत राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांनी तब्बल २९ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. नगर शहरातही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी सात हजार ७०० मतांनी मताधिक्य मिळवित शिवसेनेचे अनिल राठोड यांना मागेच ठेवले आहे. पारनेर मतदारसंघात विधानसभेचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांना पहि्या अकरा फेरीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी पुढे जाऊ दिले नाही. लंके सध्या ३७ हजार मतांची आघाडी घेऊन पुढे आहेत. या व्यतिरिक्त अपेक्षेप्रमाणे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांची घौडदौड सुरूच आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com