Congress- NCP to initiate unity of all opposition parties in Maharashtra | Sarkarnama

काँग्रेस - राष्ट्रवादीची राज्यात विरोधकांच्या एकजुटीसाठी फिल्डिंग 

मृणालिनी नानिवडेकर 
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

भारतीय कम्युनिस्ट पक्ष , मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष , शेतकरी कामगार पार्टी , भारिप बहुजन महासंघ , राजू शेटटी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांना महागटबंधनात सामील होण्याचे आमंत्रण देण्यात येणार आहे.

मुंबई  : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रितपणे लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असतानाच आता समविचारी पक्षांना एकत्र घेवून महागटबंधन करावे असा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या एक दोन दिवसात यासंबंधात महाराष्ट्रातील आठ धर्मनिरपेक्ष पक्षांना देशातील वातावरण स्वच्छ करण्यासाठी एकत्र या असे आवाहन केले जाणार आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

भारतीय कम्युनिस्ट पक्ष , मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष , शेतकरी कामगार पार्टी , भारिप बहुजन महासंघ , राजू शेटटी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांना महागटबंधनात सामील होण्याचे आमंत्रण देण्यात येणार आहे.

 श्री गणेशाच्या आगमना नंतर एक दोन दिवसात  या संदर्भातील बोलणी केली जातीलअशी शक्यता आहे  राज्याच्या ज्या भागात या पक्षांचा प्रभाव आहे त्यांना तेथे संधी देण्याची तयारी दोन्ही बडया पक्षांनी दाखवली आहे. शेकाप तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभा लढण्याची इच्छा आहे काय याची चाचपणी केली जाते आहे.

मंगळवारी  झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ,जयंत पाटील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यासंदर्भात चर्चा करतील असे निश्‍चित झाले. कम्युनिस्ट पक्ष आघाडी संदर्भात काय भूमिका घेतात ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे.48 लोकसभा जागांचे वाटप कसे करायचे हा प्रश्‍न आहे.मात्र तो यशस्वीपणे सोडवता येईल असेही आज निश्‍चित झाले.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे , माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच दोन्ही पक्षांचे महत्वाचे नेते मंगळवारच्या  बैठकीला हजर होते. भारत बंदच्या आयोजनानंतर राज्यातील समविचारी पक्षांशी संपर्क करण्याचा निर्णय झाला आहे. छोटे पक्ष या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात ते आता स्पष्ट होईल.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख