सरकार 5 काय 15 वर्षे चालेल : जयंत पाटील 

दिल्लीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये दोन दिवस यशस्वी वाटाघाटी झाल्या. आता पुढील ऍक्‍शन उद्या शुक्रवारपासूनमुंबईत होईल.
सरकार 5 काय 15 वर्षे चालेल : जयंत पाटील 

दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्ष आणि शिवसेनेचे सरकार पूर्ण पाच वर्षेच काय पंधरा वर्षे चालेल, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

जयंत पाटील म्हणाले, "" राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाला आघाडी सरकारचा आणि समन्वयाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आता या आघाडीत शिवसेना हा नवा पक्ष येत आहे. असे सरकार चालवताना समन्वय खूप महत्त्वाचा असतो. काही लोकांना असे वाटते की, सर्व पक्षांचे जर एकमत आहे तर सरकार लवकर का बनवत नाहीत. पण पुढे अडचणी येऊ नयेत म्हणून प्रत्येक गोष्ट विचार विनिमय करून ठरवली जात आहे. एकदा समन्वयाची यंत्रणा उभी राहिली की सरकार पाच काय पंधरा वर्षेही चालू शकेल. 

एका प्रश्‍नाचे उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, "" कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षात दोन दिवस झालेली चर्चा फलदायी
ठरली आहे. आता आम्ही आमच्या मित्रपक्षांशी आधी चर्चा करू आणि नंतर शिवसेनेशी अंतिम चर्चा करू. मित्रपक्षांशी चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

किमान समान कार्यक्रम राज्याच्या विकासाला चालना देणारा असेल, असेही जयंत पाटील म्हणाले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा जाहीर चर्चेचा मानत नाही. योग्य वेळी योग्य ठिकाणी हा विषय मांडला जाईल, असे सांगत जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का? या प्रश्‍नाला परतवून लावले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही सत्तास्थापनेचा दिवस अगदी जवळ आला असल्याचे सांगितले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असेही ते म्हणाले. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे का? असे विचारले असता श्री. भुजबळ म्हणाले, याबाबत मला काही कल्पना नाही. माझ्यासमोर या विषयावर चर्चा झालेली नाही. 
... 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com