भाजपविरुद्ध पिंपरी-चिंचवडला विरोधक एकत्र

भाजपविरुद्ध पिंपरी-चिंचवडला विरोधक एकत्र

पिंपरीः पिंपरी-चिंचवडमधील पाणीप्रश्न सोमवारी चिघळला. पाणीपुरवठा होणारे धरण भरूनही सत्ताधारी भाजपने शहरात  दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने त्याविरोधात विरोधक एकवटले.कॉंग्रेसने पाणीकपात रद्द करण्यासाठी पालिकेवर धडक मोर्चा काढला.

तर,मनसेने आपल्या स्टाइलने पालिका आवारात महापौरांच्या मोटारीजवळ मोकळे माठ फोडले. 

 पाणीकपात रद्दची मागणी भाजप नगरसेविका प्रियांका बारसे यांनी करून स्वपक्षाला घरचा आहेर दिला.दुसरीकडे पालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी व शिवसेना या ज्वलंत व गंभीरप्रश्नी चुप्पी साधून असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुढीलवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा असूनही २५ नोव्हेंबरपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्याबद्दल रहिवाशांत तीव्र संताप आहे. भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनीही त्याचा निषेध केला आहे. आज त्याविरोधात दोन आंदोलन झाली. कॉंग्रेसने पालिकेवर धडक मोर्चा काढला.तर मनसेने माठ फोडो आंदोलन पालिकेसमोर केले. 

सत्ताधाऱ्यांचा आशिर्वाद असलेल्या टॅंकर लॉबीची तिजोरी भरण्यासाठी ही पाणीकपात सुरु केल्याचा आऱोप कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचीन साठे यांनी यावेळी केला.त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने पालिकेवर धडक मोर्चा सोमवारी सकाळी काढण्यात आला. यावेळी पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,टॅंकर लॉबी बंद करा, अशा घोषणा देण्यात आल्या.

तर, दुपारी मनसेचे नगरसेवक असलेले शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर मोकळे माठ फोडून आंदोलन करण्यात आले.त्यात राजू सावळे,रुपेश पटेकर, अश्विनी बांगर, सीपाणं्ीमा बेलापूरकर, चंद्रकांत दानवले, दत्ता देवतरासे, मयूर चिंचवडे आदींनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

मुबलक पाणीसाठा असताना पाणीकपात करून शहरवासियांना वेठीस धरण्याच्या या प्रकाराचा मनसेने निषेध केला.तर,भाजप नगरसेविका प्रियांका बारसे यांनी सत्ताधारी असल्याने याप्रश्नी आंदोलन न करता आयुक्तांना निवेदन दिले. दिवसाआड पाणी देऊनही ते पुरेशा दाबाने व आवश्यक तेवढे मिळत नसल्याने पाणीपुरवठा पूर्ववत करा,अशी मागणी त्यांनी केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com