Congress MLA Yashomati Thakur takes aggressive stand | Sarkarnama

आमदार यशोमती ठाकूर यांचे पालकमंत्र्यांच्या बैठकीत पाण्यासाठी रौद्र स्वरूप 

अरुण जोशी 
सोमवार, 13 मे 2019

यशोमती ठाकूर व रणजित कांबळे यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी लाडेकर यांना धारेवर धरत पक्षपात करण्याचा आरोप केला . यावेळी प्रचंड घोषणाबाजीने कार्यालय दणाणून गेले होते.  

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला पाणी सोडण्यात यावे याबाबत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. 

त्यामुळे रविवारी रात्री12वाजता अप्पर वर्धा धरणाला पाणी सुटणार असल्याचे पत्र व आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले होते . परंतु पाणी सोडण्याच्या काही तास अगोदर अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला.  त्यामुळे आज सोमवारी दुपारी 1 वाजता काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर या आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या व तिथं त्यांनी ठिया आंदोलन केलं.

 याचवेळी दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसची समितीही तिथं आली व त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. त्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी आपला मोर्चा जलसंपदा विभागाकडे वळविला व तिथे सुरु असलेल्याला पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत त्या धरल्या . यशोमती ठाकूर यांनी  बैठकीत रौद्र रूप धारण करीत  धरणातून  पाणी सोडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी आमदारांनी आक्रमक  भाषेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले . यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, आमदार वीरेंद्र जगताप, माजी मंत्री रणजित कांबळे,काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस जिल्हाधक्ष बबलू देशमुख, उपस्थित होते. 

यशोमती ठाकूर व रणजित कांबळे यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी लाडेकर यांना धारेवर धरत पक्षपात करण्याचा आरोप केला . यावेळी प्रचंड घोषणाबाजीने कार्यालय दणाणून गेले होते.  यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज सायंकाळ पर्यंत अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याचे जाहीर केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख