`आमदार सुनील केदार हे सर्वात मोठे गुंड'

सावनेर विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी काल सिल्लेवाडा येथे स्टार बसच्या शुभारंभप्रसंगी कार्यकर्त्यांसह येऊन गुंडगिरी केल्याचा आरोप आज भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांनी केला. सुनील केदार हे सर्वात मोठे गुंड असल्याचेही पोतदार यांनी आज पत्रकार परीषदेत सांगितले.
dr. rajieev potdar and sunil kedar
dr. rajieev potdar and sunil kedar

नागपूर : सावनेर विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी काल सिल्लेवाडा येथे स्टार बसच्या शुभारंभप्रसंगी कार्यकर्त्यांसह येऊन गुंडगिरी केल्याचा आरोप आज भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांनी केला. सुनील केदार हे सर्वात मोठे गुंड असल्याचेही पोतदार यांनी आज पत्रकार परीषदेत सांगितले. 

सिल्लेवाडा येथे काल स्टार बसच्या शुभारंभाचा कार्यक्रम सुरु असताना केदारांनी गावाच्या सरपंचांना का बोलावले नाही, असे म्हणत राडा सुरु केला. 

आम्ही मंचावर बसलो असताना आमच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भाजपचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या लोकांना त्यांच्या घरात घुसुन मारु, अशी धमकी त्यांनी दिली. त्यांची ही गुंडगिरी कदापि खपवून घेतली जाणार नाही. पोलिस अधीक्षकांकडे याची तक्रार करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही झाल्या प्रकाराची माहिती दिली आहे. केंद्रीय गुहमंत्र्यांकडेही केदारांची तक्रार करण्यात येणार आहे. मागील निवडणुकीतही त्यांनी एसडीओ आणि न्यायव्यवस्थेवर दबाव आणला होता. त्यापूर्वी 2009च्या विधानसभा निवडणुकीत केदारांनी आमच्या वाहनावर हल्ला केला होता. या हल्ल्यात वाहनाचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले होते आणि मी व माजी आमदार डॉ. आशिष देशमुख हल्ल्यातून तेव्हा वाचलो होतो, असेही पोतदार यांनी सांगितले. केदारांवर अनेक गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर भाजपचा झेंडा लावणार 
आमदार केदार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना घरात घुसुन मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या धमकीला न घाबरता उद्या आम्ही सिल्लेवाड्यातील भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर झेंडे लावणार आहोत. ते स्वतः वाळू माफिया असून सट्टापट्टी आणि अनेक अवैध व्यवसायांना त्यांचे संरक्षण असल्याचा आरोपही डॉ. राजीव पोतदार यांनी केला. 

पत्रकार परीषदेला यावेळी रमेश मानकर, सोनबा मुसळे, संजय टेकाडे, अशोक तांदुळकर, देवीदास मदनकर, अनिल तंबाखे, लक्ष्मण पंडागडे आदी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com