मतदान होताच काँग्रेसच्या संजय कदमांनी काढली विजयी मिरवणूक !

राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम व विद्यमान आमदार काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्यात काटे की टक्कर झाली आहे.
Yogesh_Kadam sanjay kadam
Yogesh_Kadam sanjay kadam

दाभोळ : दापोली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम व विद्यमान आमदार काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्यात काटे की टक्कर झाली आहे.
 आमदार संजय कदम यांनी प्रथेप्रमाणे मतमोजणी होण्याअगोदरच आज विजयी मिरवणूक त्यांच्या दापोली येथील कार्यालया पासून खेड पर्यंत काढली आहे . खेड तालुक्यातील भरणा नाका येथील काळकाई मंदिराजवळ आता  भव्य मिरवणूक सुरु आहे .
 आमदार संजय कदम यांनी आजपर्यंत लढवलेल्या सर्व निवडणुकांत ते विजयी झाले असून मतमोजणी अगोदरच मतदान झाल्या दिवशीच सायंकाळी मतदान संपल्यावर विजयी मिरवणूक काढण्याची त्यांची परंपरा आहे . या निवडणुकीत नेहमीप्रमाणे आपणच विजयी होणार असा दावा त्यांनी केला आहे . 

तर दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी योगेश कदम हेच या निवडणुकीत विजयी होणार असे म्हणत मतदान झाल्यावर सायंकाळी दापोली शहरातील विविध ठिकाणी मतमोजणी अगोदरच फटाके फोडले आहेत या दोन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केल्याने मतमोजणीनंतर कोण विजयी होतो याकडे दापोली करांचे लक्ष लागले आहे  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com