congress mla nasim khan lays foundation of Ram Mandir | Sarkarnama

काँग्रेस आमदार नसीम खान यांच्याहस्ते राम मंदिराचे भूमीपूजन

कृष्णा  जोशी 
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

मुंबई : काँग्रेसचे चांदिवली येथील आमदार आरिफ (नसीम) खान यांच्या हस्ते आज येथील राम जानकी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन झाले. 

मुंबई : काँग्रेसचे चांदिवली येथील आमदार आरिफ (नसीम) खान यांच्या हस्ते आज येथील राम जानकी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन झाले. 

 80 वर्षांचे हे मंदिर बरेच जुने झाले असल्यामुळे त्याचा जीर्णोद्धार करण्याची मागणी होत होती. अखेर खान यांच्या प्रयत्नांनंतर त्याच्या जीर्णोद्धाराचा निर्णय झाला. त्याचे भूमिपूजन खान यांच्या हस्ते आज करण्यात आले. आमदार नसीम खान हे मुस्लिमबहुल मतदारसंघातून निवडून येत असले तरीही ते हिंदूंच्या सणांमध्ये ही उत्साहाने सहभागी होण्याबाबत प्रसिद्ध आहेत.

 मतदारसंघातील रक्षाबंधन, गणपती, दहीहंडी तसेच ख्रिसमस या सणांनाही त्यांचा सक्रिय पाठिंबा असतो व त्यात ते या ना त्या प्रकारे सहभाग घेतात. आजच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मंदिराचे पुजारी, स्थानिक उत्तर भारतीय समाजाचे मान्यवर तसेच स्थानिक व्यापारी मंडळाचे पदाधिकारी हजर होते.

भारतीय जनता पक्षाने अयोध्येत राम मंदिर उभारण्याबाबत काहीही केले नाही असा आरोप केला जातो. मात्र त्यांनी मुंबईत पश्चिम रेल्वेवर राम मंदिर रेल्वे स्थानक तयार केल्याने ते स्थानक हा विनोदाचा विषय झाला होता.

आता आयोध्येतील रामंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागेल तेव्हा लागेल. काँग्रेस पक्ष त्याबाबत काय भूमिका घ्यायची असेल ती घेईल. मात्र आपणही राम मंदिराचे भूमिपूजन केले हेच नसीम खान यांनी आज दाखवून दिले अशी प्रतिक्रियाही यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख