congress mla mehtre | Sarkarnama

आमदार म्हेत्रे अनुभवतायत भाजपचे धक्कातंत्र

प्रमोद बोडके - सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 डिसेंबर 2016

सोलापूर - सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी अक्कलकोटचे कॉंग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या माध्यमातून निशाणा साधला. भाजपची पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही खेळी यशस्वी झाली. आता त्याच भाजपने आमदार म्हेत्रेंना त्यांच्या मायभूमीत अक्कलकोट व दुधनी नगरपरिषदेच्या निवडणुकीत चितपट केले आहे.

भाजपच्या या "दे धक्का' खेळीचा पुरेपूर प्रत्यय आमदार म्हेत्रे घेत आहेत. 
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील धुसफुस ओळखून भाजपने राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांना पुरस्कृत करून पाठिंबा दिला. शिवसेना-भाजपची ताकद नगण्य असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे फिल्डिंग लावली. 

विधानपरिषदेला मदतीच्या बदल्यात अक्कलकोटमधील विकास कामांचा शब्दही घेण्यात आला. विकास कामांच्या शब्दाची पूर्तताही झाली. आता वेळ आली ती भाजप विरुद्ध आमदार म्हेत्रे यांच्या राजकीय लढाईची. आमदार म्हेत्रेंची जन्मभूमी असलेल्या दुधनी नगरपरिषदेत गेल्या 60 वर्षांहून अधिक काळापासून कॉंग्रेसचा पर्यायाने म्हेत्रेंच्या मर्जीतील नगराध्यक्ष होत होता. अक्कलकोटचेही नगराध्यक्षपद कॉंग्रेसकडे होते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत दुधनी आणि अक्कलकोटची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर सोपविली. या दोन्ही निवडणुकीत कॉंग्रेसला पर्यायाने आमदार म्हेत्रेंना चितपट करण्याची किमया भाजपने घडविली आहे. राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो. वेळ येईल तेव्हा आपल्या सोयीनुसार वापर करायचा असतो या म्हणीची प्रचिती आमदार म्हेत्रे व त्यांच्या कार्यकर्त्यांना येऊ लागली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख