Congress Mla Komatireddy-Vyankat- gets heart attack after receiving defeat news | Sarkarnama

पराभवाची बातमी येताच आमदाराला हदयविकाराचा झटका

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

.

हैदराबाद : नलगोंडा मतदारसंघातील कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आणि उमेदवार कोमाटी रेड्डी व्यंकट रेड्डी यांना आपल्या पराभवाची वार्ता कळताच हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

 त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

टीआरएसचे उमेदवार कांचरला  रेड्डी यांनी त्याचा १६ हजार २३३ मतांनी पराभव केला आहे . 

युवक काँग्रेसमध्ये राजकारणाची सुरुवात केलेल्या कोमाटी रेड्डी व्यंकट रेड्डी  यांनी नलगोंडा  मतदारसंघातून १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असा सलग चार वेळा आमदार म्हणून विजय मिळविला होता .

वाय एस आर राजशेखर रेड्डी यांच्या मंत्री मंडळात त्यांनी माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्रिपद भूषविलेले आहे . तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता . 

त्यांचे लहान भाऊ राज गोपाळ रेड्डी पंधराव्या लोकसभेचे सदस्य होते . सध्या राज गोपाळ रेड्डी तेलंगणा विधान परिषदेचे सदस्य आहेत .  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख