congress mla from gujrat donates per head ten lakh for health services | Sarkarnama

निरोगी गुजरातसाठी काँग्रेसचे 'जागृत आमदार'!  

संपत मोरे
गुरुवार, 26 मार्च 2020

जागृत आमदार आणि निरोगी गुजरात अशी हाक गुजरातमध्ये काँग्रेसने दिली आहे.

पुणे : "कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी गुजरातमध्ये काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराने दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्या आमदारांच्या मतदारसंघात त्या निधीतून वैद्यकीय साधने, तपासणी, निदान या गोष्टी केल्या जाणार आहेत. गुजरातमध्ये "जागृत आमदार-निरोगी गुजरात" अशी हाक काँग्रेसने दिली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी खासदार राजीव सातव यांनी दिली.

कोरोना व्हायरसमुळे देशभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने लॉक डॉऊन जाहीर केला आहे. कोरोनाच्या विरोधातील लढाई प्रत्येकजण आपापल्या पातळीवर लढत आहे. मदतीचे शेकडो हात पुढे येत आहेत. लोकप्रतिनिधी संवेदनशिलता जपत पुढे येत आहेत. लोकांना धीर देत आहेत.

गुजरातमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात कोरोनाच्या विरोधातील लढ्यासाठी ज्या अत्यावश्यक वस्तूंची गरज आहे, त्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या आमदार फंडातून या निधीची तरतूद केली आहे. आपल्या मतदारसंघात निदान, तपासणी, वैद्यकीय किट, आणि सुरक्षा उपकरणसाठी यासाठी 10 लाख रुपये दिले आहेत. कोरोनाच्या संदर्भात ज्या अडचणी येतील त्याबाबत गुजरात काँग्रेसने लोकांना संपर्काचे आवाहन केले आहे. जागृत आमदार आणि निरोगी गुजरात अशी हाक गुजरातमध्ये काँग्रेसने दिली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख