भाऊसाहेब कांबळेंच्या 'हाता'वर गुरुवारी शिवबंधन

श्रीरामपूर विधानसभेचे सदस्य भाऊसाहेब कांबळे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची साथ सोडली आहे. ते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विधानसभेची उमेदवारी पक्की करून घेतली आहे.
Balasaheb Thorat - Bhausahe Kamble
Balasaheb Thorat - Bhausahe Kamble

नगर : श्रीरामपूर विधानसभेचे सदस्य भाऊसाहेब कांबळे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची साथ सोडली आहे. ते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विधानसभेची उमेदवारी पक्की करून घेतली आहे. 

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या घडामोडीमुळे थोरात यांना मोठा धक्का मानला जातो. काल विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. या वेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, खासदार प्रताप जाधव, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. कांबळे यांनी विधानसभेला उमेदवारी देण्याबाबत शब्दही घेतला. 

त्यामुळे युती झाली, तरी कांबळे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. कारण कांबळे हे पुर्वाश्रमीचे विखे पाटील यांचेच कार्यकर्ते होते. लोकसभेच्या दरम्यान त्यांनी विखे पाटील यांची साथ सोडून थोरातांना हात दिला. लोकसभेला उमेदवारी करून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. थोरात यांच्या बालेकिल्ला असलेल्या संगमनेर तालुक्यातूनही कांबळे यांची पिछेहाट दिसून आली. त्यामुळे थोरात यांचा हात सोडून त्यांनी शिवधनुष्य हाती घेतले आहे.

विखे पाटील यांची साथ मिळणार
कांबळे हे पुर्वाश्रमीचे विखे पाटील यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत जात असल्याने विखे पाटील यांची त्यांना साथ मिळणार आहे. या मतदारसंघात लोकसभेला युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांंना चांगली मते मिळाली. आगामी काळातही भाजपचीच लाट असल्याने त्यांना निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते.

गुरुवारी पक्षप्रवेश : कांबळे
मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेसोबत राहणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे आता शिवसेनेत प्रवेश करीत असून, विधानसभेची उमेदवारी मिळण्याबाबत शब्द मिळाला आहे. त्यामुळे गुरुवारी शिवसेनेत पक्षप्रवेश होईल, असे भाऊसाहेब कांबळे यांनी `सरकारनामा` शी बोलताना सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com