अधिक सुरक्षिततेसाठी कॉंग्रेसचे आमदार जयपूरऐवजी भोपाळला

अधिक सुरक्षिततेसाठी कॉंग्रेसचे आमदार जयपूरऐवजी भोपाळला

पुणे : कॉंग्रेस आमदारांना फोडाफोडीच्या भीतीने आता जयपूर ऐवजी भोपाळला हलविण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात जवळपास दहा दिवस हे सर्व आमदार जयपूरला होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सर्व आमदार असून त्यांच्या निवासस्थानातून आज सायंकाळी सर्व आमदार भोपाळला नेण्यात येणार आहेत. 

नव्याने स्थापन झालेल्या फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या काळात घोडेबाजार होण्याची शक्‍यता आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाईल, अशी शक्‍यता कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत असल्याने आमदार भोपाळला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जयपूरऐवजी भोपाळला मुक्काम हलविण्याचा निर्णय कक्षाच्या दिल्लीतील नेतृत्वाने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 
कॉंग्रेसचे 44 आमदार आहेत. यापैकी एकही आमदार फुटणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे भोपाळमध्ये हे आमदार अधिक सुरक्षित राहतील, असे सांगण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com