आदिती सिंहांचा रोखठोक बाणा : मी एक हिंदुस्थानी आहे! 

आदिती सिंहांचा रोखठोक बाणा : मी एक हिंदुस्थानी आहे! 

पुणे - उत्तर प्रदेशातील सदर रायबरेलीच्या कॉंग्रेस आमदार आदिती सिंह यांनी 370 वे कलम हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून, पाठिंबा दर्शवला आहे. कॉंग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेणाऱ्या आदिती सिंह त्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

`United we stand! Jai Hind #Article370' असे ट्विट करीत आदिती सिंह यांनी हा पाठिंबा दर्शवला आहे. आदिती सिंहांच्या या ट्विटवर एकाने `तुम्ही तर कॉंग्रेसी आहात' अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर `मी एक हिंदुस्थानी आहे' असे उत्तर दिले आहे.

आमदार आदिती सिंहांच्या रोखठोक बाण्यामुळे त्यांचे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com