नितीन राऊत यांनी केली अर्णब गोस्वामींविरुद्ध पोलिस तक्रार दाखल

रिपब्लिक वाहिनीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल 'प्राईम टाईम' या त्यांच्या कार्यक्रमात अनुद्गार काढले. राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्याविरोधात सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
Congress Minister Nitin Raut Files Complaint Agains Republic TV Editor Arnab Goswami
Congress Minister Nitin Raut Files Complaint Agains Republic TV Editor Arnab Goswami

नागपूर : रिपब्लिक वाहिनीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल  'प्राईम टाईम' या त्यांच्या कार्यक्रमात अनुद्गार काढले. राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्याविरोधात सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

गोस्वामींच्या विरोधात भादंवी कलम 153, 153-अ, 153-ब, अ 295, अ 298, 500, 504, 505(2), 506, 120-ब आणि 117 अन्वये काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गोस्वामींनी टीका केल्यानंतर केल्यानंतर काल ट्विटरवर सर्वप्रथम डीपी बदलविण्यासाठीही डॉ. राऊत यांनी पुढाकार घेतला होता.

गोस्वामींच्या विरोधात कॉंग्रेस नेत्यांकडून राज्यभरात तक्रारी करण्यात आल्या आहेत. रिपब्लिक भारत न्यूज चॅनलवर आयोजित चर्चेदरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी करणे आणि सामाजिक द्वेष पसरवण्याचा आरोप करीत कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात गोस्वामीं विरुद्ध तक्रार दिली. 

अतुल लोंढे यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला की, मंगळवारी रात्री 9 वाजता रिपब्लिक भारत चॅनलवर अर्णब गोस्वामी महाराष्ट्राच्या पालघरमध्ये झालेल्या मॉबलिंचिंगवर चर्चेचे संचालन करीत होते. यावेळी त्यांनी सोनिया गांधींवर आक्षेपार्ह टिपणी केली. त्यांचे हे वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. यामुळे धार्मिक भावना भडकत आहे. गोस्वामी यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात यावी. नागपुरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांनीही तक्रारी दाखल केल्या.

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनीही केली कारवाईची मागणी

याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी 'एडीटर्स गिल्ड'कडे गोस्वामींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. गोस्वामींनी नुकताच गिल्डमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्हिडीओ कॉन्फ्ररन्सद्वारे अखिल भारतीय कॉंग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत गोस्वामींनी केलेल्या प्रकाराचा निषेध केला.  

या बैठकीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, खासदार राजीव सातव, खासदार कुमार केतकर, खासदार बाळू धानोरकर, कॉंग्रेसचे इतर मंत्री आणि नेते सहभागी झाले होते. त्यांनीसुद्धा गोस्वामींच्या विरोधात सदर पोलीस ठाण्यात तक्रार करुन अटक करण्याची मागणी केली आहे. राज्यघटनेच्या गाभ्यावरच हा हल्ला असल्याचे कॉंग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. छत्तीसगढमध्ये गोस्वामींच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. राज्यभर निदर्शनेही करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com